स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनं या आठवड्यात सगळ्या मालिकांना मागे टाकत पहिला क्रमांक गाठला आहे. गेली अनेक दिवस मालिका टिआरपीच्या शर्यतीत मागे पडली होती. परंतू या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीला धोबीपछाड दिला आहे. मालिका 6.8 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.
मागील 2 महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेली रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेला 6.6 टिआरपी रेटिंग मिळालं आहे.
या आठवड्यात आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा मालिका एकामागोमाग आहेत. अरुंधती यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असून नेहमीप्रमाणे दीपा आणि अरुंधतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. आई कुठे काय करते मालिकेला 6.2 टिआरपी रेटिंग मिळालं आहे.
स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका सध्या टिआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळत आहेत. कीर्ती आणि शुभम यांचा बदलेला लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून फुलाला सुगंध मातीचा ही मालिका या आठवड्यात 6.1 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.
तुझेच मी गीत गात आहे ही मलिका या आठवड्यात 5व्या क्रमांकावर असून मालिकेला 5.6 टिआरपी रेटिंग मिळालं आहे. स्वराचा स्वराज झाल्यानंतर मालिकेला नवं वळण आलं आहे. प्रेक्षकांना मालिका आवडत असल्याची ही पोच पावती आहे.
5.7 टिआरपी रेटिंगसह रंग माझा वेगळा ही मालिका पुन्हा एखदा सहाव्या क्रमांकावर आहे.
अप्पू आणि शंशाक यांची धम्माल या आठवड्यात कुठेतरी कमी पडल्याचं दिसतंय. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका या आठवड्यात 5.6 टिआरपी रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे.
झी मराठीच्या सगळ्याच मालिकांचं टिआरपी रेटिंग पार गडबडून गेलं आहे. झी मराठीवरील केवळ माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका 5.3 टिआरपी रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे.
तर पुन्हा एकदा 4.9 टिआरपी रेटिंगसह कीर्ती शुभमची गोष्ट नवव्या क्रमांकावर आली आहे.
शंतनू आणि पल्लवी यांच्या स्वाभिमानची कहाणी काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याचं पाहायला मिळतंय. मालिका दहाव्या क्रमांकावर आली असून मालिकेला 4.4 हे सर्वात कमी रेटिंग मिळालं आहे.