बालक पालक, टाइमपास, टकाटक सारख्या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर सक्रीय असतो.
टाइमपास 3 आणि टकाटक 2 या दोन्ही सिनेमांमुळे मागच्या काही महिन्यांपासून प्रथमेश परब सातत्यानं चर्चेत आहे.
प्राजूच्या प्रेमासाठी वेडा दगडू प्रेक्षकांना पाहिला आहे. पण आता प्रथमेशच्या आयुष्यात त्याची खरी प्राजक्ता आली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
अभिनेता प्रथमेश परबनं दिवाळीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. ज्यात त्याच्याबरोबर असलेली मुलगी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे.
"निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!", असं म्हणत प्रथमेशनं सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
प्रथमेशनं त्याच्या मैत्रिणीबरोबर शेअर केलेले फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. प्रथमेश रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
ट्रेडिशनल आऊटफिट मधील दोघांचा हा रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांनी "दादूस आमची वहिनी काय?", असा प्रश्न प्रथमेशला विचारला आहे.
दोघांनी दिवाळीनिमित्त खास फोटोशूट शेअर केलं आहे. क्षितिजा घोसाळकर असं प्रथमेशच्या मैत्रिणीचं नावं आहे. ती मॉडेल तसेच कन्टेंड राइटर आहे.
प्रथमेश आणि क्षितीजा यांनी याआधीही एकत्र फोटोशूट केलेले फोटो दोघांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पाहायला मिळतात.
या चर्चांवर अभिनेता प्रथमेश परब मात्र उत्तर दिलेलं नाहीये. त्याचे चाहते त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत.