बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते.
पण या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा आल्या अन चाहते नाराज झाले. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.
आता ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दिशाने टायगर आणि त्याच्या बहिणीसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
एवढंच नाही तर दोघांनी एकत्र प्रवास देखील सोबत केला. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात टायगर श्रॉफ आणि दिशा एकत्र आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, या दोघांनी पापाराझींना वेगवेगळ्या पोझ दिल्या.
या कार्यक्रमात दिशा आणि टायगर एकमेकांच्या शेजारी बसले होते. यासोबत टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ तिची आई आयशा श्रॉफसोबत दिशाच्या शेजारी बसली होती.
इव्हेंटमधील काही फोटोंमध्ये दिशा आणि टायगर एकत्र हसताना आणि कॅमेरामनसाठी वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये पोज देताना दिसत आहेत.
आता दोघेही एकत्र दिसल्याने त्यांचं पुन्हा पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगत आहेत.
आता या दोघांमध्ये नेमकं नातं काय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.