आज आपण बॉलिवूडच्या अशा सात अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहे, ज्यांनी बॉलिवू़ड हिट सिनेमे दिले, शिवाय अनेक पुरस्कार देखील मिळवले. असं जरी असलं तरी या अभिनेत्री आपल्या एक वेगळी ओळख निर्माण करू शकले नाहीत. मग सध्या या अभिनेत्री काय करतात, कसं आयुष्य जगतात याबद्दल जाणून घेणार आहे.
या लिस्टमध्ये पहिला नंबर लागतो तो, मालिनी शर्मा या अभिनेत्रीचा. मालिने कोण तर जिनं बिपाशा बासुसोबत 'राज' या सिनेमात भूताची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ती एका टीव्ही शोमध्ये दिसली होती. मात्र अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. सध्या अशी चर्चा आहे की, ती 2024 मध्ये येणाऱ्या 'हेट स्टोरी 5' या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
शाहरुख खानसोबत 'स्वदेश' या ब्लॉकबस्टर चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी गायत्री जोशी इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाली आहे. गायत्री फेमिना मिस इंडिया टॉप 5 मध्ये होती. तिला या सिनेमासाठी 4 वेगवेगळे पुरस्कार मिळाले होते. मात्र लग्नानंतर तिनं इंडस्ट्री सोडली.
नंदिनी सिंहने दिनो मौर्यासोबत 'प्लॅटफॉर्म', गोविंदासोबत 'एक और एक ग्यारह' यांसारख्या चित्रपटात काम केले. यानंतर तिनं टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. 2015 मध्ये ती 'कोड रेड तलाश'मध्ये दिसली होती आणि नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली.
आयुष्मान खुरानासोबत 'नौटंकी साला'मधून डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा साळवीने या एकाच चित्रपटात दिसली. तिनं अनेक ब्रँड एंडोर्समेंटसाठी काम केले. मात्र अनेक वर्षांपासून ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम/फाइल फोटो)
प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्राने एकाच हिंदी चित्रपट 'जिद'मध्ये काम केले होते. त्यानंतर तिनं तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ती आता म्युझिक व्हिडिओमध्ये काम करताना दिसतो. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम/फाइल फोटो)
उदिता गोस्वामी ही तिच्या काळातील टॉप अभिनेत्री होती. तिने बिपाशा, करीना कपूर खान आणि त्या काळातील सर्व अभिनेत्रींना तगडी टक्कर दिली. तिनं 'जेहर', 'अक्सर' सारख्या अनेक चित्रपटात काम केले. मात्र मोहित सूरीसोबत लग्न केल्यानंतर तिने इंडस्ट्री सोडली आणि डीजे म्हणून काम करायला सुरुवात केली. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम/फाइल फोटो)
कोयना मित्राने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. साकी-साकी या गाण्यातून तिला खरी ओळख मिळाली. सुंदर असूनही तिनं प्लास्टिक सर्जरी केली, त्यानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. त्यानंतर ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम/फाइल फोटो)