द केरळ स्टोरीमध्ये अदा शर्माच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक होतंय.
अदाहने 2008 साली '1920' या हॉरर फिल्म मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा बी-टाऊनचा सर्वात चांगला हॉरर चित्रपट मानला जातो.
एवढेच नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याचवेळी दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने प्रेक्षकांना डायपर घालण्याचे आवाहन केले होते.
अदाने या चित्रपटात भूताची भूमिका केली होती. अभिनेत्रीचा अभिनय इतका जबरदस्त होता की तिने लोकांमध्ये भीती निर्माण केली होती.
दुसरीकडे, अदा शर्माने फिल्मबीटला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल सांगितले होते, "जर तुम्ही अभिनेता असाल तर तुमची एकच स्टाईल असू नये, कारण ते चुकीचे असेल. त्याचप्रमाणे, मलाही केवळ सुंदर दिसणारी आणि पैसे कमावणारी अभिनेत्री व्हायचे नव्हते.' असं तिने सांगितलं होतं.
अदा पुढे म्हणाली की माझ्या वेगवेगळ्या शैली आहेत आणि त्या सर्व तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतील आणि मी तुम्हाला चेतावणी देऊ इच्छिते की जे दर्शक चित्रपट पाहणार आहेत त्यांनी डायपर घालणे आवश्यक आहे. कारण हा चित्रपट तुम्हाला हादरवून सोडेल."
यादरम्यान तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अदा म्हणाली की, 'ही व्यक्तिरेखा अतिशय हुशार होती, जी आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटात कोणीही साकारली नाही.'
अदाचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालताना दिसून येत आहे.