अभिजीत पानसे लिखीत आणि दिग्दर्शित रानबाजार या नव्या वेब सिरीजची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या वेब सिरीजचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
वेब सिरीजच्या टीझरने प्रेक्षकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. आपल्या लाडक्या अभिनेत्रींना बोल्ड अवतारात पाहून प्रेक्षकही अवाक झाले होते. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घातला असून सिनेमाच्या ट्रेलरने काही तासात लाखो व्ह्यूज मिळवले आहेत.
रानबाझार या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत आहेत. दोघींच्याही धक्क करणाऱ्या अंदाजाने चाहते अवाक झालेत.
वेब सिरीजमध्ये उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगल, अनंत जोग, सुरेखा कुडची,वनिता खरात, माधुरी पवार, गिरीश दातार, अतुल काळे इ. कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर स्वत: दिग्दर्शक अभिजीत पानसे देखील सिरीजमध्ये अभिनय करताना दिसणार आहेत.
वेब सिरीजच्या पोस्टर लाँच नंतरही सिरीजच्या नावावरुन अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. रानबाजार हे नाव अनेकांना खटकले होते. परंतु वेब सिरीजच्या नावावरुन लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.
वेब सिरीजचे नाव हे आधी **बाजार असे ठेवण्यात आले होते. परंतु नाव बदलून रानबाजार असे ठेवण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना निर्माते म्हणाले, सिरीजला हेच नाव असावे हे माझे या स्टोरीविषयीचे फर्स्ट एक्सप्रेशन होते. वेब सिरीजच्या नावावरुन कोणतीही सनसनाटी तयार करण्याचा आमचा हेतू नव्हता. हाही एक समाज असून आपल्या समाजाचा भाग आहे. मात्र तिथे आपल्याला जायचे नाही किंवा त्याकडे पाहायचे नाही. फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन हे फार क्रिएटिव्ह भाषेत असणं गरजेचं हवे असं मला वाटतं.
निर्माते पुढे म्हणाले, मला मराठी प्रेक्षकांवर पूर्णपणे विश्वास आहे. ते ही सिरीज पाहतील तेव्हा ते याचं फार चांगल्या प्रकारे स्वागत करतील.