NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tejaswini Pandit: धक्कादायक! पुण्याच्या नगरसेवकाची तेजस्विनीकडे घाणेरडी मागणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

Tejaswini Pandit: धक्कादायक! पुण्याच्या नगरसेवकाची तेजस्विनीकडे घाणेरडी मागणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

मराठी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने नुकताच तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तेजस्विनी पंडित हिच्यासोबत पुण्यात एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत असताना ही घटना घडली. या फ्लॅटच्या मालकाने तिच्याकडे धक्कादायक मागणी केली होती. काय आहे हे प्रकरण वाचा.

18

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे.

28

आपल्या ग्लॅमरस स्टाइल आणि दमदार अभिनयाने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या या अभिनेत्रीने आता तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग सांगत मोठा खुलासा केला आहे,

38

स्ट्रगलिंगच्या काळात नाव कमवण्यासाठी धडपडत असताना पुण्यातील एका नगरसेवकाने आपल्याकडे घाणेरडी मागणी केली होती, असा दावा तेजस्विनीने केला आहे. नुकतंच एका पॉडकास्टवर मुलाखत देत असताना तेजस्विनीने नगरसेवकाचे नाव घेण्याचं टाळत त्याने केलेल्या निर्लज्ज ऑफरविषयी सांगितलं

48

तेजस्विनी म्हणाली कि, ''२००९-२०१० च्या आसपासची गोष्ट आहे. आम्ही पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचो. त्यावेळी माझे एक-दोनच सिनेमे रिलीज झाले होते. अपार्टमेंट एका नगरसेवकाच्या मालकीचे होते.''

58

ती पुढे म्हणाली, ''मी भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने मला थेट ऑफर दिली,'' असा खुलासा तेजस्विनीने केला आहे.

68

पण तिने सुद्धा ऐकून न घेता त्या नगरसेवकाला जशास तसे उत्तर दिले होते. ती म्हणाली, ''टेबलावर पाण्याचा ग्लास होता, मी तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला.''

78

''मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या,'' असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी म्हणाली.

88

तेजस्विनी पुढे म्हणाली की, "माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता."

  • FIRST PUBLISHED :