अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं नवीन वर्षात प्रेक्षकांना खास सरप्राइज दिलं आहे.
अथांगनंतर तेजस्विनीची निर्मिती असलेला बांबू हा सिनेमा रिलीज झालाय.
दरम्यान तेजस्विनीनं तिच्या आणि दिग्दर्शक संजय जाधवच्या नात्याविषयी भाष्य केलं आहे.
पटलं तर घ्या हा नवा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झालाय. या कार्यक्रमात अभिजीत पानसे आणि तेजस्विनी पंडीत सहभागी झाले होते.
यात तेजस्विनीला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले.
तेजस्विनीचा बेस्ट आणि वाईट रूमर्ड काय होता हे सांगताना तेजस्विनीनं तिच्या आणि संजय जाधवच्या नात्याविषयी खुलासा केला.
तेजस्विनी म्हणाली, 'माझं आणि संजय जाधवचं अफेअर आहे हे सगळ्यात वाईट रुमर्ड होतं'.
'कारण संजय जाधव माझा दादा आहे. मी त्याला दादा म्हणते'.
'आम्ही दोघेही इतके घट्ट आहोत. कारण दादा मला त्याची मुलगी द्वितीसारखं ट्रिट करतो'.
'आमचं दोघांच्या अफेअर आहे असं रूमर्ड करणं हे फार चुकीचं होतं', असं तेजस्विनी म्हटलं.