'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो.
बऱ्याच दिवसांपासून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यापासून गायब आहे. आता तिने मोठी घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
तेजश्री प्रधान लवकरच एका मालिकेत दिसणार असल्याची घोषणा तिने केली आहे. तिची ही घोषणा ऐकून चाहते भलतेच खुश झाले आहेत.
तेजश्री प्रधान लवकरच स्टार प्रवाहाच्या एका मालिकेत दिसणार आहे. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात लिहिलंय की, 'मंडळी, आपली लाडकी अभिनेत्री तेजश्री लवकरच आपल्या भेटीला येतेय स्टार प्रवाह वर एका नव्या कोऱ्या मालिकेत'
तेजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केलाय, त्यात तिने म्हटलंय की, 'मी येतेय... आपल्या लाडक्या स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेत... आता कोणती मालिका, कधी सुरु होणार हे तुम्हाला लवकरच कळेल' अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
तेजश्रीला नव्या मालिकेत पाहायला मिळणार म्हटल्यावर तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी पोस्टखाली कमेंट करत उत्सुकता दर्शवली आहे.
तेजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'तेजश्री नेहमी वेगवेगळे विषय हाताळत असते,बघूया यावेळी कोणतं नवीन कथानक आहे..', 'खूप छान...... कुठे गायब होती ताई इतक्या दिवस', 'याचीच तर वाट बघत होतो आम्ही' 'खूप आनंद झाला तू मालिकेतून भेटायला येती आहे मी खूप वाट बघत तुझी मालिका कधी येते आहे' अशा कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजश्रीची ही मालिका कोणती असेल, त्यात तिची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.