साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री महालक्ष्मीनं केलेल्या दुसऱ्या लग्नानंतर ती सातत्यानं चर्चेत आहे.
2022मध्ये महालक्ष्मीनं फिल्ममेकर रवींद्र चंद्रशेखरनबरोबर लग्न केलं. त्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात.
चंद्रशेखरनच्या दिसण्यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. महालक्ष्मीनं त्याच्याबरोबर लग्न का केलं असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय.
अभिनेत्री महालक्ष्मी आणि तिच्या नवऱ्यानं कधीच ट्रोलिंगवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालेलं नाही.
महालक्ष्मी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच दोघांचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसते. या फोटोंवरून दोघांना प्रचंड ट्रोल करण्यात आलंय.
'आयुष्य खूप सुंदर आहे आणि तू ही', असं म्हणत महालक्ष्मीनं दोघांचा रोमँटिक फोटो शेअर केलाय.
तर रवींदरही बायकोबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलंय, 'मी तुझ्यावर प्रेम करतो हा माझा आनंद नाहीये तर तू माझ्यासाठी जगतेयस हा माझा आनंद आहे'.
'100 दिवसांचा हा प्रवास पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलण्याचा प्रयत्न केला आहे. मी ड्रामॅटिक लिहू शकत नाही. मला जे वाटतंय ते मी लिहतोय', असं त्यानं म्हटलंय.
हा फोटो नेटकऱ्यांच्या नजरेस पडता दोघांना ट्रोल करत अनेक प्रश्न विचारलेत.
एका युझरनं म्हटलंय, 'भावा तूला सरकारी नाकरी आहे का?'
तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, 'आयुष्यात पैसे खूप महत्त्वाचं काम करतात'.
तर आणखी एका युझरनं म्हटलंय, 'पैसा आहे तर सगळं काही शक्य आहे. पैसा बोलतो'.