NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Munmun Dutta : अभिनय नाही तर जेठालालच्या बबिता जींना करायचं होतं 'या' क्षेत्रात काम

Munmun Dutta : अभिनय नाही तर जेठालालच्या बबिता जींना करायचं होतं 'या' क्षेत्रात काम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या मुनमुन दत्ताला अभिनय क्षेत्रात नाही तर या' क्षेत्रात काम करायचं होत. आजच्या दिवशी तिचं हे सिक्रेट जाणून घ्या.

110

मुनमुन दत्ता हीचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथे झाला. आज 'बबिता जी' या नावाने ती भारतभर प्रसिद्ध आहे.

210

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जशी बबिता जीची व्यक्तिरेखा ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे, तशीच खऱ्या आयुष्यातही मुनमुन दत्ता अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे.

310

मुनमुन दत्ताचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते.

410

मुनमुन दत्ताने 2004 मध्ये 'हम सब बाराती' या टेलिव्हिजन शोमधून करिअरची सुरुवात केली होती.

510

त्यानंतर तिने तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये प्रवेश केला आणि ती गेल्या 15 वर्षांपासून या शोशी जोडली गेली आहे.

610

टेलिव्हिजनशिवाय मुनमुन दत्ता बॉलीवूड चित्रपटांचाही भाग आहे. मुनमुन दत्ताने 'मुंबई एक्स्प्रेस' आणि 'हॉलिडे' सारख्या चित्रपटात काम केले असले तरी त्यामुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही.

710

मुनमुन दत्ताने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती अभ्यासात चांगली असल्याने तिला डॉक्टर बनायचे होते.

810

पण नशिबाने काही वेगळेच लिहिले होते. त्यानंतर मुनमुन दत्ताने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली.

910

अभिनयासोबतच मुनमुन दत्ताला प्रवासाचीही आवड आहे आणि ती अनेकदा ट्रॅव्हल व्लॉग बनवते.

1010

अभिनयात प्रसिद्धी मिळवली असली तरी मुनमुन दत्ताचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे.

  • FIRST PUBLISHED :