NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Taapsee pannu : 'मी अजून प्रेग्नेंट नाही...' लग्नाबद्दल 'त्या' प्रश्नावर तापसी पन्नूनं लगावला प्रसिद्ध अभिनेत्रीला टोला

Taapsee pannu : 'मी अजून प्रेग्नेंट नाही...' लग्नाबद्दल 'त्या' प्रश्नावर तापसी पन्नूनं लगावला प्रसिद्ध अभिनेत्रीला टोला

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची सुरुवात केलेली अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूड मधेही जम बसवला आहे. तिच्या विविध भूमिकांचं नेहमीच कौतुक होतं. पण आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असणारी तापसी आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. नुकतचं तिने लग्नाबद्दल भाष्य करत बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीला टोला लगावला आहे.

18

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाची सुरुवात केलेली अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूड मधेही जम बसवला आहे. तिच्या विविध भूमिकांचं नेहमीच कौतुक होतं.

28

तापसी पन्नू सध्या सोशल मीडियापासून दूर आहे. पण चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिने 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन आयोजित केलं होतं.

38

तापसी पन्नूने याद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची भन्नाट उत्तरं दिली.

48

याच सेशनदरम्यान एका चाहत्यानं तापसीला लग्नाबद्दल प्रश्न विचारला ज्यावर तिनं असं उत्तर दिलं कि ज्याची आता चर्चा होतेय.

58

अभिनेत्री तापसी पन्नू लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यामुळेच एका चाहत्यानं तापसीला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, "मी अजून प्रेग्नंट नाही... त्यामुळे सध्यातरी मी लग्न करणार नाही.''

68

चाहत्याच्या प्रश्नाचं भन्नाट उत्तर दिल्यामुळे तापसी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

78

तापसीच्या या उत्तरामध्ये तिने आलिया भट्टला टोला लगावला असल्याचं चाहते म्हणत आहेत. कारण लग्ननंतर काही महिन्यातच आलियाने एका मुलीला जन्म दिला होता. त्यामुळे तापसीच्या या उत्तराचा रोख आलियाकडे असल्याचं चाहते म्हणतायत.

88

'आस्क मी एनीथिंग' या सेशनदरम्यान सोशल मीडियापासून दूर राहण्याचं कारण देत तापसी पन्नू म्हणाली,"सोशल मीडियावर सध्या नकारात्मक वातावरण आहे, असं मला वाटतं. ट्रोलिंग होत आहे. एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहेत".

  • FIRST PUBLISHED :