NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाडनं दिली मोठी गुडन्यूज! अभिनेत्रीवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाडनं दिली मोठी गुडन्यूज! अभिनेत्रीवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

मराठी मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिक भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. तिने आतापर्यंत विविध मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ताचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. आता नुकतंच प्राजक्ताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

19

मराठी मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिक भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. तिने आतापर्यंत विविध मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

29

अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.

39

सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. नुकतंच प्राजक्ताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

49

प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ताने गळ्यात आयडी, ब्लेझर परिधान केला आहे.

59

प्राजक्ताने नुकतंच अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

69

प्राजक्ता छान मार्कांनी पास होत इंजिनिअर झाली आहे. तिने फोटो शेअर करताना 'कॉम्प्युटर इंजिनिअरींग शिक्षण (Computer Engineering) पूर्ण केले. डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. ( CGPA : 8.77 ), इंजिनिअर अभिनेत्री' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

79

प्राजक्ताने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे.

89

प्राजक्ताव्हा या पोस्टवर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी तिच्या पोस्टवर ‘ताई शुभेच्छा’ असे कमेंट करत म्हटले आहे.

99

शूटिंग सांभाळत सेटवर अभ्यास करत प्राजक्ताने हे यश मिळवलं आहे. त्यामुळं चाहत्यांना तिचं खूपच कौतुक वाटत आहे.

  • FIRST PUBLISHED :