स्वराने फहादसोबतच्या कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करून लवकरच पारंपरिक पद्धतीनुसार लग्न करणार असल्याची घोषणाही केली होती. आता तिच्या लग्नाबद्दल काही अपडेट समोर आले आहेत.
रिपोर्टनुसार, 11 ते 16 मार्च या कालावधीत जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हळदी, मेहेंदी आणि संगीत समारंभही आयोजित केले जातील आणि त्यानंतर हे जोडपे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधतील.
तिच्या कुटुंबातील एका जवळच्या स्त्रोताने डेस्टिनेशन वेडिंगऐवजी स्वरा दिल्लीतील तिच्या आजोबा आणि आजीच्या घरी लग्नगाठ बांधणार आहेत असा खुलासा केला आहे.
आता या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हि लग्नपत्रिका खूपच अनोखी आहे. या दोघांची पहिली भेट शाहिनबागेतील आंदोलनात झाली होती. त्याच खास चित्र या पत्रिकेवर पाहायला मिळतंय. त्याशिवाय पत्रिकेत 'इन्कलाब झिंदाबाद' असं देखील लिहिलं आहे.
याशिवाय कार्डमध्ये एक खास संदेश लिहिला आहे की, "कधी कधी आपण एखादि खास गोष्ट आपल्या जवळ असताना तिचा दूरवर शोध घेत राहतो. पण ते तुमच्यासोबतच असतं. आम्ही प्रेम शोधत होतो पण आम्हाला मैत्री आधी मिळाली.'
तिने पुढे म्हटलंय कि, 'अंधाराच्या वेळी, आम्हाला एकत्र प्रकाश सापडला. द्वेषाच्या काळात आम्हाला प्रेम मिळाले. होय, चिंता, अनिश्चितता आणि भीती देखील होती. पण विश्वास आणि आशा देखील आहे. आमच्या आनंदात सामील व्हा.'
स्वराच्या लग्नाचं हे हटके कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.