स्वरा भास्करने 16 फेब्रुवारी रोजी फहाद अहमदसोबत लग्न करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले होते.
स्वराने फहादसोबतच्या कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करून लवकरच पारंपरिक पद्धतीनुसार लग्न करणार असल्याची घोषणाही केली होती. आता तिच्या लग्नाबद्दल काही अपडेट समोर आले आहेत.
मध्यंतरी स्वरा भास्करने तिच्या सुहागरातचा देखील एक फोटो शेअर केला होता. आता तिच्या लग्नाबद्दल माहिती समोर आली आहे.
स्वरा भास्कर आणि फहाद अहमद पुढच्या आठवड्यात ग्रँड लग्न करणार आहेत.
रिपोर्टनुसार, 11 ते 16 मार्च या कालावधीत जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हळदी, मेहेंदी आणि संगीत समारंभही आयोजित केले जातील आणि त्यानंतर हे जोडपे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधतील.
तिच्या कुटुंबातील एका जवळच्या स्त्रोताने डेस्टिनेशन वेडिंगऐवजी स्वरा दिल्लीतील तिच्या आजोबा आणि आजीच्या घरी लग्नगाठ बांधणार आहेत असा खुलासा केला आहे.
स्वराच्या लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू झाली आहे आणि ती लग्नाचे सर्व विधी देखील करणार आहे.
रिपोर्टनुसार, स्वरा भास्करच्या लग्नात काही जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. तिच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.