अभिनेत्री स्वरा भास्करने अलीकडेच राजकीय कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्नाची घोषणा केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
या दोघांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले होते. आता हे लव्ह बर्ड्स एका शानदार सोहळ्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
लग्नाआधीच्या कार्यक्रमांना आज सुरुवात झाली आहे. दिल्लीतील स्वराच्या आजी-आजोबांच्या फार्महाऊसवर लग्नाचे विधी पार पडत आहेत.
तिच्या शाही लग्नाची तयारी सुरु झाली असून आता हळदीचे फोटो समोर आले आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये स्वरा आणि फहाद हळदीच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत.
हळदीसाठी स्वरा आणि फहादने शुभ्र पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत.
रिपोर्टनुसार, 11 ते 16 मार्च या कालावधीत जोडप्याच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये हळदी, मेहेंदी आणि संगीत समारंभही आयोजित केले जातील आणि त्यानंतर हे जोडपे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधतील.
रिपोर्टनुसार, स्वरा भास्करच्या लग्नात काही जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. तिच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.