विविध मालिका आणि सिनेमे यामधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुयश टिळक एका नव्या भूमिकेत समोर येणार आहे.
सुयशने का रे दुरावा या मालिकेतून छोट्या पडदयावर आगमन केलं. त्यानंतर बाप माणूस, शुभमंगल ऑनलाइन या मालिकेतही सुयशने चाहत्यांची मनं जिंकली.
आता सुयश अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
झी मराठीवरच्या 'लोकमान्य' या मालिकेत सुयश टिळक एंट्री घेणार आहे.
'नवीन वर्षात झी मराठीच्या “लोकमान्य” ह्या मालिकेत वासुदेव बळवंत फडके ही महत्वाची भूमिका साकारायची संधी मिळाली.' असं म्हणत सुयशने त्याचा मालिकेतील लूक शेअर केला आहे.
लोकमान्य मालिकेत सुयश टिळक क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारणार आहे.
सुयश पहिल्यांदाच अशा धाटणीची भूमिका साकारणार असून त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
आता लोकमान्य मालिकेत सुयश टिळक क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा अभिनय कसा साकारणार प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देणार ते पाहणं महत्वाचं आहे.