NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 6 वर्षापूर्वी 'या' सुपरस्टारनं बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं, परदेशातही होती याच्याच नावाची चर्चा

6 वर्षापूर्वी 'या' सुपरस्टारनं बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं, परदेशातही होती याच्याच नावाची चर्चा

2017 मध्ये सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी बॉक्स ऑफिसवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यानंतर साऊथ सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने अशी धडाकेबाज एन्ट्री मारली की, तमाम बॉलिवूड स्टार्सचे धाबे दणाणले. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रभास आहे. त्यावर्षी प्रभासचा एकच चित्रपट 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संपूर्ण बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं.

16

वर्ष 2017 मध्ये सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी बॉक्स ऑफिसवर एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यानंतर साऊथ सिनेसृष्टीतील एका सुपरस्टारने अशी धडाकेबाज एन्ट्री मारली की, तमाम बॉलिवूड स्टार्सचे धाबे दणाणले. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रभास आहे. त्यावर्षी प्रभासचा एकच चित्रपट 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संपूर्ण बॉलीवूडवरकरांना सळो की पळो करून सोडलं.

26

2015 मध्ये प्रभासचा 'बाहुबली' चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने तो पॅन इंडियाचा स्टार बनला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. बरोबर दोन वर्षांनंतर प्रभासने या सिनेमाच्या सिक्वेलने खळबळ उडवून दिली. त्याच्या 'बाहुबली 2' ने देशातच नाही तर परदेशातही भरपूर कमाई केली. त्याचे असे झाले की प्रभासच्या बाहुबली 2 समोर सर्व बॉलीवूड चित्रपट फिके पडले. त्या वर्षी सलमान खान ते अक्षय कुमार सारख्या स्टार्सला मागे टाकून प्रभास नंबर 1 सुपरस्टार बनला.

36

2017 मध्ये आलेल्या प्रभासच्या 'बाहुबली 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. साऊथचा एखादा चित्रपट संपूर्ण बॉलीवूडला धूळ चाकलेस असं कोणालाच वाटलं नव्हतं. तो त्यावर्षी देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. (फोटो क्रेडिट्स: IMDB)

46

प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बाहुबली 2'चे बजेट 195 कोटी रुपये होते, मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तब्बल 800 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने देश-विदेशात भरपूर कमाई केली. 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर चौपट कमाई करून इतिहास रचला. (फोटो क्रेडिट्स: IMDB)

56

त्याचवर्षी, सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट थिएटरमध्ये आला, जो ब्लॉकबस्टर ठरला. त्याचवेळी अजय देवगणचा 'गोलमाल अगेन' आणि अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेम कथा' सारखे चित्रपटही यशस्वी झाले, पण बॉलिवूडचा एकही चित्रपट 'बाहुबली 2'च्या कमाईसोबत स्पर्धा करू शकला नाही.

66

सध्या प्रभास त्याच्या 'कल्की 2898 एडी' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता, ज्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसारखे स्टार्सही दिसणार आहेत. त्याचवेळी कमल हासन देखील या चित्रपटाचा एक भाग आहे, जो चित्रपटात खलनायक बनून प्रभासशी स्पर्धा करेल. (फोटो क्रेडिट्स: IMDB)

  • FIRST PUBLISHED :