बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातात. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये, अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे ज्याची चर्चा होतेय.
एका पॉडकास्ट दरम्यान अभिनेत्याने 90 च्या दशकात त्याला अंडरवर्ल्डमधून नियमितपणे कॉल येत असे असा खुलासा केला आहे.
त्याबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, ''आम्ही अशा वेळी होतो जेव्हा इथे मुंबईत अंडरवर्ल्डचं राज्य होतं.' याविषयी पुढे ते म्हणाले, 'तुम्हाला माहीत आहे का मला फोन यायचे. ते मला वेगवेगळ्या धमक्या द्यायचे.'
याविषयी पुढे ते म्हणाले, 'पोलिस मला सांगत होते, तू वेडा आहेस. तुला समजत नाही, ते नाराज होतील आणि ते काहीही करू शकतात.' पण मी म्हणायचो, 'काय? मी काहीही चूक केलेली नाही, माझे रक्षण करा."
याविषयी बोलताना सुनील शेट्टी यांनी याविषयी त्यांच्या कुटुंबियांना काहीही कल्पना नसल्याचं देखील सांगितलं आहे.
ते पुढे म्हणाले की, "मी अथिया आणि अहानला काय झालं ते कधीच सांगितलं नाही. मी काही वेड्यासारखे काम केले. जखमी झालो, त्यातून बाहेर पडलो. पण या सगळ्यावर आपण तंदुरुस्त असणं हा एकमेव उपाय आहे असं मी मानतो'
आजवर अनेक अभिनेत्यांचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. काही त्यात अडकले तर काही लवकरच त्यातून बाहेर पडले.
आता सुनील शेट्टींनी केलेल्या या खुलास्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.