सुंदर मनामध्ये भरली मालिकेतील लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
अक्षयाचा 28वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नाही तर एका शाळेत गेली होती.
ठाणे तालुक्यातील डाटीवळी येथे एका वस्तीतील का पल्बिक स्कूलमध्ये अक्षयाने तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. या शाळेत बर्थडे सेलिब्रेट करण्याचं कारणही अक्षयाने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं.
अक्षया म्हणाली, "या शाळेत फार गरीब घरांतील मुलं येतात आणि अनेकदा त्यांना शाळेत येण्याचा कंटाळा येतो. अशावेळी जेव्हा आपण त्यांना भेटायला जातो. सेलिब्रेशन करतो तेव्हा त्यांना तितकंच मोटिवेशन मिळायला लागतं".
बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन करणाऱ्यांना अक्षयानं सल्ला देखील दिला आहे. तिनं म्हटलंय, "आपण वाढदिवशी हमखास ३-७ हजार रुपये स्वतःच्या शॉपिंगवर, मित्रांना पार्टी देताना खर्च करतो. विचार करा जर हीच, किंवा यातली थोडी जरी रक्कम तुम्ही बाजुला काढून या लहान मुलांसाठी काही केलंत तर त्यांना किती आनंद आणि तुम्हाला किती पुण्य मिळेल"
"माझ्या वाढदिवसानिमित्त मी आव्हान करते, तुम्ही किमान एक मूल दत्तक घ्या. आपल्या एका वेळेच्या पार्टीचा जो खर्च होतो, तो त्या मुलांची वर्षाभराची फी असते. नक्की विचार करा", असं अक्षयाने शेवटी म्हटलं आहे.
शाळेतला मुलांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करायला गेलेल्या अक्षयाचं तिथं स्वागत करण्यात आलं. तिला ओवाळण्यात आलं. सगळा शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी अक्षयाला खास बर्थडे विश केलं. केक कटिंग केलं.
अक्षयाने सगळ्या मुलांसाठी आर्थिक मदत तर केलीच पण त्याचप्रमाणे सगळ्यां मुलांसाठी खास खाऊ देऊन नेला होता.
शाळेत अक्षयानं सगळ्या विद्यार्थ्यांची गप्पा मारल्या. त्यांच्यावर अभ्यास केला. अक्षयाबरोबर वेळ घालवण्यात मुलांचाही अर्धा वेळ निघून गेला.