कलर्स मराठीवरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली.
मालिकेती अभ्या लतीची जोडी अल्पावधीतच हिट झाली.
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेनं नुकतेच 800 भाग पूर्ण केले आहेत.
या निमित्तानं सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या सेटवर चांगलंच सेलिब्रेशन झालं. चाहत्यांच्या उपस्थितीत 800 भागांचा टप्पा गाठल्याचं सेलिब्रेशन झालं.
या सेलिब्रेशनमध्ये मालिकेतील कलाकार तर सहभागी झाले होतेच शिवाय प्रेक्षकांचा लाडका अभ्या देखील उपस्थित होता.
मालिकेत लीप आल्यापासून लति आणि अभ्याच्या जोडीला प्रेक्षक खूप मिस करत होते. मात्र आता तो पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर आलेला पाहायला मिळाला.
मालिकेत नव्या हिरोची म्हणजेच देवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कुणालनं हे फोटो शेअर केले आहेत.
अभ्या आणि लतीला पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच त्यांनी सगळ्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.