कलर्स मराठीवरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली.
मालिका सुरू झाल्यापासूनच कायम चर्चेत होती.
लती आणि अभ्याची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. मालिकेचं कथानकही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत अखेर मालिकेनं 700 भागांचा टप्पा गाठला आहे.
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेच्या सेटवर सगळ्या कलाकारांनी जंगी सेलिब्रेशन केलं.
700 भागांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
मालिकेत सध्या लती आणि अदिराच्या नव्या प्रवासाची सुरूवात पाहायला मिळत आहे.
अभि आणि लतीची मुलगी दिसत जरी लति सारखी असली तरी तिची ध्येय अभ्यासारखीच आहेत.
दौलतरावाच्या एंट्री नंतर मालिका आता आणखीच इंट्रेस्टिंग होत चालली आहे. अशातच मालिकेनं 700 भाग पूर्ण केल्यानं सेटवर आनंदाचं वातावरण आहे.