रंग माझा वेगळा मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असून 14 वर्षांचा लिप दाखवण्यात येणार आहे.
14 वर्षांनंतर कार्तिकी आणि दीपिका मोठ्या झालेल्या दाखवण्यात येणार आहेत. दीपा आणि कार्तिकच्या मोठ्या मुलींची सगळीकडेच चर्चा आहे.
यात मोठी दीपिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यातील फोटो समोर आले आहेत.
मालिकेत मोठ्या दीपिकाची भूमिका अभिनेत्री तनिष्का विषे साकारणार आहे.
तनिष्काने याआधी भरत जाधव आणि केदार शिंदे यांच्या 'सुखी माणसाचा सदरा' या गाजलेल्या मालिकेत काम केलेलं आहे.
तनिष्काने या मालिकेत दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यानंतर ती सोनी मराठीवरील 'कुसुम' या मालिकेत सुद्धा दिसली होती.
तनिष्का रंग माझा वेगळा मालिकेत अगदी साध्या सालस मुलीची भूमिका साकारणार असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती फारच स्टायलिश आणि बोल्ड आहे.
तनिष्का विषे अभिनयासोबतच नृत्यांगना देखील आहे. तिला या नवीन भूमिकेत प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.