'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही सतत चर्चेत असते.
तिचं 'शालिनी' हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.
शालिनीनं म्हणजेच माधवीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.
नेहमी साडीत दिसणाऱ्या माधवीनं बोल्ड अवतारात फोटो शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शालिनीचं म्हणजेच माधवी निमकरचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिचे हे हॉट फोटो चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत.
वयाची पस्तिशी ओलांडलेली माधवी अतिशय फिटनेस प्रेमी आहे.
या वयातील तिचा हा फिटनेस पाहून चाहते नेहमीच आश्चर्यचकित होतात.