मर्डर 2 चित्रपटातील अभिनेत्री सुलग्ना पाणीग्रहीने कॉमेडियन बिस्वा कल्याण रथसोबत लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
बिस्वाने शेअर केलेल्या फोटोला मजेदार कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहीलं आहे, ‘Bisva Married Admi’ या कॅप्शनमुळे त्याच्या स्टॅडअप कॉमेडीतल्या एका जोकची आठवण त्याच्या चाहत्यांना झाली आहे.
बिस्वा आणि सुलग्नाच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते अभिनंदानाचा वर्षाव करत आहेत.
त्यांचं लग्न 9 डिसेंबर 2020 रोजी झालं आहे. पण त्यांनी आज फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुलग्ना पाणीग्रहीने इश्क वाला लव्ह, रेड, पिंकी ब्युटी पार्लर अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे.
बिस्वाचे स्टॅडअप कॉमेडी शो अतिशय प्रसिद्ध आहेत. Amazon Prime वरील एका कॉमेडी शोमध्ये बिस्वा जजच्या भूमिकेतही दिसला होता.