NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Spruha Joshi: 'माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप आभार...' स्पृहा जोशीची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट

Spruha Joshi: 'माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप आभार...' स्पृहा जोशीची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट

स्पृहा जोशी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. निरागस हास्य, दमदार अभिनय यांसोबतच आपल्या सुंदर कवितांमुळे ती लोकप्रिय आहे. नुकतंच तिने एका स्पेशल व्यक्तीसाठी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

18

स्पृहा जोशी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. निरागस हास्य, दमदार अभिनय यांसोबतच आपल्या सुंदर कवितांमुळे ती लोकप्रिय आहे.

28

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झी मराठीवरील 'लोकमान्य' या मालिकेत काम करत आहे.

38

'लोकमान्य' या मालिकेत स्पृहाने सत्यभामा ही लोकमान्य टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

48

उंच माझा झोका या मालिकेतुन घराघरात पोहचलेल्या स्पृहाची ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना भावली.

58

आता भामाच्या रूपातील काही फोटो शेअर करत स्पृहाने 'माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप आभार, भामे.. 🌸' असं म्हटलं आहे.

68

या पोस्टमध्ये तिने तिची स्वतःची एक कविता देखील शेअर केली आहे. 'स्वप्नात स्वप्न.. भासात भास, सुवर्ण मृग.. अलगद फास, नाटकात नाटक.. तळ्यात चंद्र, वारा झपताल.. सप्तक मंद्र, पायी पैंजण.. भवताल कुंपण, तुझ्यात मी.. माझ्यात तू ...,अमर्याद एकटेपण.. !! अशी एक कविता लिहिली आहे.

78

स्पृहाचे हे फोटो आणि तिची ही कविता चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

88

स्पृहाची ही पोस्ट पाहून लोकमान्य या मालिकेतून ती निरोप घेणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे चाहते तिला छोट्या पडद्यावर मिस करतील हे नक्की.

  • FIRST PUBLISHED :