दक्षिण भारतीय अभिनेत्री, प्रिया वासुदेव मणी, तिला प्रियमणी म्हणून सर्वजण ओळखतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. प्रियमणीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. तिला द फॅमिली मॅनमधील तिच्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, प्रियामणीने तिचा प्रियकर मुस्तफा राजसोबत लग्न केले आहे.तिच्या प्रेमाचा आणि क्रिकेटचा जवळचा संबंध आहे.
प्रियामणीचे पूर्ण नाव प्रिया वासुदेव मणी अय्यर असून ती एक तमिळ ब्राह्मण आहे. तिने प्रेमाखातर धर्माची भिंत ओलांडली. तिने मुस्लीम असलेल्या मुस्तफा राजशी लग्न केले. मात्र, दोघांच्या लग्नात बराच गोंधळ झाला होता.
मुस्तफा राजचे आधीच लग्न झाले होते आणि त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आयशा आहे. ते दोघे 2013 मध्ये वेगळे झाले. त्यानंतरच प्रियामणीने 2017 मध्ये मुस्तफा राजशी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर मुस्तफाची पहिली पत्नी आयशाने आपला घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला होता
तसेच प्रियामणी आणि मुस्तफा राज यांचे लग्न वैध नसल्याचं ती म्हणाली होती. पण, मुस्तफाने आयशाचे हे दावे फेटाळून लावले आणि ती पैशांसाठी खोटे दावे करत असल्याचं म्हटलं होतं.
प्रियमणीचा पती मुस्तफाने काही एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. मुस्तफाला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत, मुस्तफा मुलांच्या शिक्षणासाठी आयशाला पैसे देतो.
प्रियामणी आणि मुस्तफा राज यांची पहिली भेट बंगळुरूमध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान झाली होती. या स्पर्धेतील एका क्रिकेट संघाची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने प्रियामणी तिच्या तिथे गेली होती.
दुसरीकडे मुस्तफा राज इव्हेंट मॅनेजर होता. तिथेच एका अधिकृत मीटिंगमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. कामाव्यतिरिक्त प्रियामणी आणि मुस्तफा यांची केरळमध्ये पहिली भेट झाली होती.
प्रियामणी आणि मुस्तफा यांची चार वर्षांची मैत्री होती. दोघांची जवळीक वाढत होती आणि त्याबद्दल चर्चाही होऊ लागली होती. आयपीएल सामन्यांमध्ये ते बऱ्याचदा एकत्र दिसायचे.
अशातच मुस्तफाने प्रियामणीला एका डान्स रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये प्रपोज केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली आणि 23 ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये लग्न केलं.
अभिनेत्री सध्या तिच्या शाहरूखसोबतच्या जवान सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे.