NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonam Kapoor: 'लंडनचा व्हिसा संपला का?' मुंबईबद्दल केलेल्या 'त्या' ट्विट नंतर सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Sonam Kapoor: 'लंडनचा व्हिसा संपला का?' मुंबईबद्दल केलेल्या 'त्या' ट्विट नंतर सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

अनिल कपूर ची मुलगी सोनम कपूर तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते. विविध विषयांवर ती नेहमीच तिचं मत व्यक्त करत असते. मुलाच्या जन्मापासून ती सोशल मीडियापासून दूर असली तरी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिने मुंबईतील वाहतूक आणि प्रदूषणाबाबत ट्विट केलंय ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.

19

सोनम कपूर तिच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते. विविध विषयांवर ती नेहमीच तिचं मत व्यक्त करत असते. मुलाच्या जन्मापासून ती सोशल मीडियापासून दूर असली तरी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

29

अभिनेत्रीने शनिवारी ट्विटरवर मुंबईतील वाहतूक आणि प्रदूषणाबाबत असे ट्विट केले आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

39

सोनम कपूरने ट्विट करून लिहिले की, "मुंबईतून गाडी चालवणे त्रासदायक आहे. सगळीकडे खोदकाम होत आहे आणि सर्वत्र बांधकाम सुरू आहे. जुहूहून बँडस्टँडला पोहोचायला मला एक तास लागला. प्रदूषण त्रासदायक आहे.. काय चालले आहे.."

49

'लंडनचा व्हिसा संपला का?' मुंबई बद्दल केलेल्या त्या ट्विटनंतर सोनम कपूर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

59

सोनमचं हे ट्विट आता चांगलंच व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

69

सोनमच्या ट्विटवर एका यूजरने लिहिले- "याला विकास म्हणतात, जे काही वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. बरं ते आता उशिरा होत आहे. तरीही तुम्ही तुमच्या एसी कारमध्ये प्रवास करत असाल आणि तुम्हाला त्रास होईल. घडत आहे.. कल्पना करा की लोक कसा प्रवास करत असतील.'

79

तर दुसऱ्या नेटकऱ्यानी तिला, 'पापा कि परी, लंडनचा व्हिसा संपला का' अशा शब्दात ट्रोल केलं आहे.

89

सोनमच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर गेल्या तीन वर्षांपासून सोनम मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही.

99

पण तिच्या 'ब्लाइंड' चित्रपटाचे आहे, ज्याचे शूटिंग पूर्ण झाले असून तो 2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शोम मखिजा आहेत.

  • FIRST PUBLISHED :