अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) नुकतंच तिच्या लंडनच्या घराचं फोटोशुट केलं आहे. तिच्या घरात अतिशय महागड्या वस्तू पाहायला मिलत आहेत. मात्र तिच्या सोफ्याने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे, रेड वेलवेट असा अलिशान तो सोफा आहे.
सोनम कपूरने आर्किटेक्चरल डाइजेस्ट (Architectural Digest) या मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्याच्या आवृत्तीसाठी हे फोटोशूट केलं आहे.
सोनमने पोझ दिलेल्या सोफ्याची किमंत तब्बल १८ लाख रुपये इतकी आहे. पती आनंद आहुजानेही यावर प्रतिक्रिया देत लिहीलं, 'जेव्हा मी यावर बसेन तेव्हा हाच फोटो आठवेन.'
सोनमचं हे अलिशान लंडनमधील घर आहे. जिथे ती पती आनंदसोबत राहते. २०१८ साली त्यांनी विवाह केला होता.
सोनम आणि आनंद यांचा बेडरूम अतिशय सुंदर आहे.
गोल्डन कलरचं सिंक आणि मॅचिंग आरसा लक्ष वेधत आहे.
सुंदर डिझाइन असलेला मुख्य दरवाजा आहे. ज्यावरील आकर्षक नक्षीकाम लक्ष वेधत आहे.
आर्किटेक्ट Rooshad Shroff यांनी हे सुंदर घर सजवलं आहे.
घरातील डायनिंग टेबल अतिशय लॅव्हिश आणि रॉयल लुक देणारा आहे.