'कॅरी ऑन जट्टा 3' मधून सोनम बाजवा पंजाबी सिनेमाची टॉप अभिनेत्री बनली आहे.
अभिनेत्री सोनम बाजवा हिने 2013 साली ‘बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर चित्रपटसृष्टीत तीची लोकप्रियता वाढली.
1989 मध्ये नैनितालमध्ये जन्मलेल्या सोनम बाजवाचे पूर्ण नाव सोनम प्रीत कौर बाजवा आहे.
सोनम ही पंजाबी सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. सोनमनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला ‘हॅप्पी न्यू इयर’ या फराह खानच्या चित्रपटात दीपिका पदूकोणच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं . नंतर काही कारणास्तव तिच्याऐवजी ही भूमिका दीपिका पादुकोणला मिळाली.
शिवाय 2019 चा आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ आणि 2020 च्या ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ या चित्रपटातही सोनमने छोटी भूमिका केली होती.
याबरोबरच चित्रपटातील कीसिंग सीनबद्दल ‘फिल्म कंपॅनीयन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनम म्हणाली होती की, “बॉलिवूडच्या चित्रपटांत काही गोष्टी करायला मी नकार दिला आहे कारण त्या गोष्टी पंजाबमधील माझ्या चाहत्यांनी पहिल्या तर त्यांना वाईट वाटू शकतं.
प्रोफेशनल लाईफसोबतच सोनम तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. सोनमचे नाव एकेकाळी प्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझसोबत जोडले गेले होते. दोघांच्या डेटींगची बरीच चर्चा झाली होती. पण दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याचं कधीच कबुल केलं नाही.
दिलजीत दोसांझशिवाय सोनमचे नाव भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबतही जोडले गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम आणि केएल राहुल यांनी एकमेकांना डेट केले होते, परंतु त्यांच्यातील नाते काही टिकू शकले नाही.