सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील विविध गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सोनालीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताच व्हायरल होतात.. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना अभिनेत्रीबाबत लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे चाहते सतत सोनालीच्या सोशल मीडियावर लक्ष ठेऊन असतात.
सध्या सोनाली व्हॅकेशन मोडवर आहे. तिने शुटिंगमधून काही दिवस ब्रेक घेतला आहे.
सोनाली कुलकर्णी सध्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पण परदेशात न जात भारतातील एका खास ठिकाणी फिरायला गेली आहे.
नुकतंच तिने एका ठिकाणाला भेट दिली. तेथील फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सोनालीचं या ठिकाणाला भेट द्यायचं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. हे ठिकाण म्हणजे भारत- पाकिस्तानच्या सीमेवरील अटारी बॉर्डर.
सोनालीने नुकतीच या ठिकाणाला कुटुंबासोबत भेट दिली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने लिहिलंय कि, ''इतक्या वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली...#wagahborder वरचा उत्साह पाहून खूप आनंद झाला. पुढे तिने म्हटलंय कि, ''देशभक्ती खऱ्या अर्थाने वाहते. इथे आलं कि ऊर्जा आणि अभिमान तुमच्यामध्ये अक्षरशः जागा होतो.''
सोनालीचे वडील सैन्यात होते. सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर हे सैन्यदलातील वैद्यकीय विभागातून निवृत्त झाले आहेत. लहानपणापासून तिने वडिलांच्या डोळ्यात देशासाठीचा अभिमान पाहिला आहे. सोनाली लहान असताना तिच्या वडिलांकडून शौर्याच्या गोष्टी ऐकायची. वडीलांच्या बदलीमुळे लहानपणी सोनालीने लष्करी कुटुंबात राहण्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे वाघा बॉर्डरला भेट देणं तिच्यासाठी महत्वाचं ठरलं आहे.