सध्या सोनाली सासर आणि माहेरच्यांसोबत तिच्या आजोळी म्हणजे पंजाबच्या अमृतसर मध्ये पोहचलीये.
काल तिने कुटुंबियांसोबत अटारी बॉर्डरला भेट देऊन एक स्वप्न पूर्ण झालं असं सांगितलं होतं.
सध्या सोनालीची आजोळी म्हणजेच अमृतसर मध्ये धम्माल चाललीये.
सोनालीची आई पंजाबी आहे. त्यामुळे सोनालीचा पंजाबशी खास नातं आहे.
सोनालीचा नवऱ्यासोबत सरसों के खेत रोमान्स चालू आहे. तिने सोशल मीडियावर हे फोटो अपलोड केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली खास पंजाबी लूक मध्ये दिसत आहे. मराठमोळी सोनाली 'पंजाब दि कुडी' शोभत आहे.
काल तिने चक्क शेतात ट्रॅक्टर चालवला होता. आता आज तिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.
आता शुटिंगमधून ब्रेक घेत ही मराठमोळी सोनाली पंजाबमध्ये रमली आहे. चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.