आलिया आणि रणबीरने आई बाबा होण्याची गोड बातमी दिल्यानंतर अनेक बॉलिवूड जोडप्यांना बाळाबद्दल विचारणा होत आहे. सध्या मराठीतील सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीकडे सुद्धा गोड बातमी असल्याच्या चर्चा होत आहेत.
सोनाली सुद्धा आई होणार आहे असा अंदाज सध्या तिचे चाहते लावताना दिसत आहेत. आणि त्याला कारण ठरलं आहे तिचा आऊटफिट.
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी गुड न्यूज देताना फॉलो केलेला ट्रेंड होता पोलका डॉट्सचा ड्रेस. तोच ड्रेस सध्या सोनालीने घातल्याचं नव्या फोटोशूटमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांकडून गुड न्यूज आहे का अशी विचारणा होत असल्याचं बघायला मिळत आहे.
एका युजरने तिच्या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिलं, “तुमच्याकडे पण गुड न्यूज काय? ड्रेस कोड वगैरे”
तर दुसरा युजर लिहितो, “हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे !!” आणखी एक युजर लिहितो, “ब्लॅक ड्रेस आणि व्हाईट डॉट्स याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात”
सोनालीच्या ड्रेसकडे बघून अनेकांनी वेगवेगळे तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. तर अनेकजण याला एक इशारा समजून तिचं अभिनंदन करत आहेत.
सोनालीने हा आउटफिट तमाशा live सिनेमाच्या प्रीमियरला घातल्याचं दिसून आलं होतं.
तसंच तिने कुटुंबियांसोबतचे काही मोजके फोटो सुद्धा शेअर केले आहेत.