मराठी तसेच हिंदी मालिकाविश्वात नाव कमावलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ.
बिगबॉस मराठीमुळे मध्यंतरी हि अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
स्नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम चर्चेत असते.
सध्या ती व्हॅकेशनचा आनंद घेत आहे.
पण कुठेही फॅन्सी ठिकाणी न जाता तीने सध्या दक्षिण भारतातील मंदिरांना भेट दिली आहे.
तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
दक्षिण भारतातील मंदिरांना भेट दिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या मंदिरांना भेट देत तिने 'इथे येणं माझ्या नशिबात लिहिलं होतं' असं म्हटलं आहे.
तिने मदुराईचं मीनाक्षी मंदिर तसेच रामेश्वरमच्या मंदिरांना भेट दिली आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल कायम चर्चेत असणाऱ्या स्नेहाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.