केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील त्याच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. त्यांना सुशांतच्या आठवणीत अश्रू अनावर झाले.
केंद्रिय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती ईराणी यांनी देखील सुशांतच्या आठवणी जागवल्या. एका मुलाखतीतल त्यांनी सुशांतबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.
सुशांतच्या निधनाबद्दल समजलं तेव्हा, स्मृती ईराणींनीहा मोठा धक्का बसला होता.
ज्या दिवशी सुशांतचं निधन झालं त्या दिवसाबद्दल सांगताना स्मृती इराणी म्हणाल्या, 'ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा मी व्हिडिओ कॉन्फरंसमध्ये होते. पण मला काही सुचत नव्हतं. मी सगळ्यांना मिटिंग बंद करुयात अशी विनंती केली.'
त्या पुढे म्हणाल्या, 'तेव्हा वाटलं की, सुशांतनं मला कॉल का केला नाही. एकदा तरी त्यानं कॉल करायला पाहिजे होता.'
त्या पुढे म्हणाल्या, 'मी त्याला म्हणाले होते की, यार तू स्वत:ला संपवू नकोस. पुढं स्मृती म्हणाल्या की, त्या सुशांतला ओळखायच्या.कारण दोघांचे सेट जवळ जवळ होते.'
स्मृती इराणी आणि सुशांतमध्ये चांगली मैत्री होती.
सुशांतच्या मृत्यूनंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता.