लोकप्रिय गायिका सावनी रवींद्रने (Savaniee Ravindra) नुकतीच एक गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सावनीच्या घरी नव्या पाहुण्याच आगमन होणार आहे.
सावनीने पती आशिषसोबत सुंदर फोटोशूट केलं आहे.
सावनीने आपले बेबी बम्पसह सुंदर फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.
सावनीने 2018 साली डॉक्टर आशिष धांडेशी लग्न केलं.
सावनी आणि आशिष आईबाबा होणार असल्याचा आंनंद साजरा करताना दिसत आहेत.
सावनीने आजवर आपल्या गोड गळ्याने अनेक सुंदर गाणी गायली आहेत.
काही दिवसांपूर्वी सावनीला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याकडून सावनीने गायनाचे धडे घेतले आहेत.
सावनीने दिलेल्या या गोड बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.