NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 38 महिन्यांत 6 चित्रपट रिलीज; सगळे ठरले फ्लॉप; 'त्या' एका सुपरहिट चित्रपटानं उजळलं अभिनेत्याचं नशीब

38 महिन्यांत 6 चित्रपट रिलीज; सगळे ठरले फ्लॉप; 'त्या' एका सुपरहिट चित्रपटानं उजळलं अभिनेत्याचं नशीब

एखाद्या अभिनेत्याला प्रसिद्ध बनवण्यासाठी फक्त एकच चित्रपट किंवा एक पात्र पुरेसं आहे, तिचं त्या अभिनेत्याची ओळख बनून जाते. 'शोले' सारख्या कल्ट क्लासिक चित्रपटातील सर्व कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बॉलिवूडच्या एका अभिनेत्याच्या आयुष्यातही असाच एक चित्रपट आला, ज्याने त्याचं नशीबच बदलून टाकलं. जेव्हा या अभिनेत्याचं करिअर बुडत असल्याचं वाटत होतं, तेव्हा त्याचा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने प्रेक्षकांमधील त्याची प्रतिमा तर बदललीच, पण त्याच्या आयुष्याला नवे वळणही दिले.

18

कोरोनाच्या काळात बॉलीवूड तसंच चित्रपट कलाकारांच्या करिअरला ग्रहण लागले. त्या काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रत्येक बॉलीवूड चित्रपटाचे मोठे नुकसान झाले, परंतु याच काळात एका अभिनेत्याचं नशीब उजळलं. हा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा.

28

सिद्धार्थ मल्होत्राचे करिअर आधीच अडचणीत आलं होतं. 2016 मध्ये आलेल्या 'कपूर अँड सन्स' या हिट चित्रपटानंतर, बॉक्स ऑफिसवर त्याचे बॅक टू बॅक 6 चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु एकही चित्रपट हिट म्हणावा असा नव्हता.

38

सिद्धार्थ मल्होत्राचे 'ए जेंटलमन' आणि 'अय्यारी', 'बार बार देखो', 'जबरिया जोडी' या चित्रपटांना फ्लॉपचा टॅग मिळाला, तर 'मरजावां' आणि 'इत्तेफाक'चे कलेक्शन जेमतेमचं होतं.

48

सिध्दार्थ मल्होत्रा​​ कोरोना कालावधीनंतर प्रकाशझोतात आला जेव्हा त्याचा 'शेरशाह' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती.

58

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा 'शेरशाह' हा चित्रपट 12 ऑगस्ट 2021 रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर प्रदर्शित झाला तेव्हा सर्वत्र चर्चा रंगू लागल्या.

68

या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्राची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली. विष्णुवर्धनचे अप्रतिम दिग्दर्शन, उत्तम गाणी, अभिनय आणि वस्तुस्थिती असलेली कथा दाखवल्यामुळे 'शेरशाह' चित्रपट प्रचंड हिट ठरला.

78

38 वर्षीय सिद्धार्थसाठी 'शेरशाह' खूप लकी ठरला. त्याने 7 फेब्रुवारी 2023 रोजी चित्रपटाची अभिनेत्री कियारा अडवाणीशी लग्न केले. त्यानंतर आलेल्या त्याच्या 'मिशन मजनू' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

88

सिद्धार्थ मल्होत्रा ​​पुढे 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात राशि खन्ना आणि दिशा पटनी यांच्याही विशेष भूमिका आहेत. तसेच याशिवाय तो रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजमध्येही झळकणार आहे.

  • FIRST PUBLISHED :