NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sidharth-Kiara Wedding : 'त्या' ठिकाणी पहिल्यांदा भेटलेले सिद्धार्थ-कियारा; ब्रेकअपपर्यंत आलेलं नातं कसं पोहोचलं लग्नापर्यंत

Sidharth-Kiara Wedding : 'त्या' ठिकाणी पहिल्यांदा भेटलेले सिद्धार्थ-कियारा; ब्रेकअपपर्यंत आलेलं नातं कसं पोहोचलं लग्नापर्यंत

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडपे लवकरच सात जन्मांच्या गाठी बांधणार आहे. आपल्या क्यूटनेसने लाखो मनांवर मोहिनी घातलेली कियारा अडवाणी आणि बॉलिवूडचा हँडसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा ​​6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या आलिशान सूर्यगड पॅलेसमध्ये जवळचे नातेवाईक आणि खास पाहुण्यांच्या उपस्थिती हे लग्न होणार आहे. मैत्रीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास लग्नापर्यंतकसा पोहचला जाणून घ्या.

111

सिद्धार्थ-कियारा या दोघांच्या लग्नाचे फंक्शन ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. नुकतेच दोघेही लग्नाच्या ठिकाणी म्हणजे जैसलमेरला पोहचले आहेत.

211

शेरशाहमध्ये या जोडीने ज्या प्रकारे जादू केली, जणू काही दोघेही एकमेकांसाठीच बनले आहेत. पण शेरशाह ही त्यांच्या मैत्रीची सुरुवात नव्हती, तर त्यांचे त्यापूर्वीच दोघे प्रेमात पडले होते.

311

या दोघांची भेट तेव्हा झाली होती जेव्हा सिद्धार्थ मल्होत्रा आधीच स्टार झालेला होता तर कियारा तिच्या करिअरसाठी संघर्ष करत होती. कियाराने कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये सांगितले की, ती सिद्धार्थ मल्होत्राला शेरशाहच्या खूप आधीपासून ओळखत होती.

411

हे दोघे कियाराच्या लस्ट स्टोरीजच्या रॅप-अप पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. ही एक अनौपचारिक बैठक होती पण कियारासाठी ती एक संस्मरणीय ठरली. ती रात्र ती कधीच विसरणार नाही, असेही कियारा म्हणाली. येथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

511

यानंतर दोघेही शेरशाह मध्ये एकत्र काम करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तोपर्यंत कियारा कबीर सिंगसोबत प्रकाशझोतात आली होती आणि तिच्या क्यूटनेसने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

611

त्यामुळेच शेरशाह हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक सिड आणि कियारा यांची नवीन जोडी ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक होते. दोघेही आधीच चांगले मित्र बनले होते, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली.

711

दरम्यान, 2020 मध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्रामवरून हॉलिडेचे फोटो शेअर केले आहेत. म्हणायचे तर दोघांनी त्यांचे वेगळे फोटो शेअर केले होते पण लोकेशन जवळपास सारखेच होते आणि दोघांनी एकत्र सुट्टी घालवल्याचे चाहत्यांनी ओळखले. येथूनच त्यांच्या डेटींगच्या बातम्यांना वार्‍या मिळू लागल्या.

811

शेरशाहमध्ये या दोघांच्या केमिस्ट्रीने जी जादू निर्माण केली होती. त्यांची ऑनस्क्रीन जोडी खूपच क्यूट दिसत होती. तेव्हापासून दोघांनी लवकर लग्न करावे ही चाहत्यांची इच्छा होती.

911

रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये दोघांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि एकमेकांच्या कुटुंबियांना भेटले. कियाराने सिद्धार्थ आणि त्याच्या पालकांना तिच्या घरी जेवायला बोलावले तेव्हा ही भेट घडली.

1011

मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एक वेळ अशी आली जेव्हा इंडस्ट्रीत चर्चा होती की त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

1111

पण दोघांमधील प्रेम इतकं गहिरं होतं की त्यांनी लवकरच परस्परांचे गैरसमज दूर करून एकमेकांना पटवून दिलं. शेवटी सर्व काही ठीक झालं आणि आता हे दोघे कायमचे एकत्र येणार आहेत.

  • FIRST PUBLISHED :