NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Aditi Rao Hydari: बॉलिवूड सुंदरी आदिती राव हैदरी या साऊथच्या अभिनेत्याच्या प्रेमात; तो फोटो व्हायरल

Aditi Rao Hydari: बॉलिवूड सुंदरी आदिती राव हैदरी या साऊथच्या अभिनेत्याच्या प्रेमात; तो फोटो व्हायरल

आदिती राव हैदरी हे चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. अदितीने हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत. तिच्या निखळ सौंदर्यासोबतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या तिच्या आणि साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोण आहे हा अभिनेता पाहा...

18

आदिती राव हैदरीने हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत.

28

आदिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थच्या प्रेमात असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

38

सिद्धार्थने नुकताच पांढऱ्या स्वेटशर्टमधला एक फोटो पोस्ट केला. विशेष म्हणजे काही काळापूर्वी अदितीनेही याच स्वेटशर्टमधला फोटो शेअर केला होता.

48

त्यामुळे आता हे दोघे एकत्र असल्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले आहे.

58

चाहते दोघांचे फोटो एकत्र करत सोशल मीडियावर त्यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत.

68

सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला, तेव्हा चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात अदितीच्या कमेंटनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं. ‘इन्स्टाग्रामवर ईदचा चंद्र’ अशी कमेंट तिने केली.

78

सिद्धार्थ आणि अदिती हे ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं.

88

अदितीच्या वाढदिवशी त्याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशा शब्दांत त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

  • FIRST PUBLISHED :