NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shweta Shinde: श्वेता शिंदेची शूटिंगवाली लव्हस्टोरी, नवऱ्याशी पहिल्या भेटीत झाली खडाजंगी!

Shweta Shinde: श्वेता शिंदेची शूटिंगवाली लव्हस्टोरी, नवऱ्याशी पहिल्या भेटीत झाली खडाजंगी!

मराठी मालिकांमध्ये एक भक्कम निर्माती म्हणून कार्यरत असणारी अभिनेत्री श्वेता शिंदे हिची भन्नाट लव्हस्टोरी माहित आहे का?

110

श्वेता शिंदे ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या श्वेता निर्मिती क्षेत्रात सुद्धा बरेच वेगवेगळे प्रयोग करताना दिसत असते.

210

खऱ्या आयुष्यात देवमाणूस लागिरं झालं जी सारख्या मालिकांची निर्मिती करणाऱ्या श्वेताचं लग्न संदीप भन्साळी यांच्याशी झालं आहे.

310

या कपलची लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे. या कपलची पहिली भेट कशी झाली त्यांचं नेमकं कस जमलं याबद्दल श्वेता झी मराठीच्या ‘बँड बाजा वरात’ कार्यक्रमात बोलताना दिसली.

410

श्वेता आणि संदीप यांची पहिली भेट शूटिंगच्या सेटवर झाली. आणि पहिल्याच भेटीत त्यांचं जोरदार भांडण झालं.

510

या खडाजंगी भांडणानंतर श्वेताच्या वाढदिवशी संदीप यांनी सरप्राईज प्लॅन करून तिच्यासाठी सेटवर केक मागवला.

610

श्वेताला याबद्दल कल्पना नसल्याने तिलाही आनंद झाला. जेव्हा तिला या सर्प्राइजबद्दल समजलं तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं. संदीप यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं भांडण मिटलं.

710

हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचं प्रेम जमलं.

810

संदीप भन्साळी हे एक डिजिटल मेन्टर आहेत. तसंच त्यांचं मार्केटिंग क्षेत्रात सुद्धा ज्ञान आहे असं त्यांच्या सोशल मीडियावरून कळून येतं.

910

श्वेता आणि संदीप यांचं मिलन म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा आणि सिंधी कढीचा संगम अशी उपमा त्यांना दिली जात आहे.

1010

श्वेता आणि तिच्या नवऱ्याची ही लव्हस्टोरी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

  • FIRST PUBLISHED :