NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shreya Bugde: मराठमोळी श्रेया बुगडे आहे गुजराती कुटुंबाची सून; खास आहे या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी

Shreya Bugde: मराठमोळी श्रेया बुगडे आहे गुजराती कुटुंबाची सून; खास आहे या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी

हटके भूमिका साकारुन रसिकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. श्रेया बुगडेने निखील सेठ याच्यासोबत लव्हमॅरेज केलं आहे. मात्र, त्यांची लव्हस्टोरी फार कमी जणांना ठावूक आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त जाणून घ्या त्यांची भन्नाट लव्हस्टोरी.

110

श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.

210

27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे.

310

आज निखिल आणि श्रेयाच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत.

410

एका मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली. या मालिकेच्या सेटवर निखील श्रेयाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे.

510

मात्र काही तरी दोघांमध्ये बिनसलं आणि वाद झाला. त्यामुळे दोघं एकमेकांपासून दूर गेले होते.

610

मात्र त्यांच्यातला हा दुरावा काही फार काळ राहिला नाही. कारण एका गाजलेल्या मराठी मालिकेचा कार्यकारी निर्माता अशी निखीलच्या नावाची क्रेडिट लाईन श्रेयाने पाहिली आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. 

710

यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा संवाद सुरु झाला. त्याच काळात निखीलच्या घरी त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती.

810

तेव्हाच निखीलने श्रेयाला प्रपोज केलं. त्याने तिला 'तू सिंगल आहेस का?' अशी विचारणा केली. त्यावर श्रेयाने हो असं उत्तर देताच निखीलने फार वेळ न दवडता तिला प्रपोज केले.

910

त्यानंतर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांचं लग्न जुळलं.

1010

निखीलसाठी हे लव्ह ऍट फर्स्ट साईट होते. मात्र श्रेयासाठी तसं नव्हते. मात्र आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत. 

  • FIRST PUBLISHED :