अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सासू सुनेची जोडी मराठी सिनेसृष्टीत चांगलीच चर्चेत आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळेनं दोन वर्षांआधी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीबरोबर लग्न केलं.
या सासू सुनेची जोडी ऑफस्क्रिन कमेस्ट्री फारच सुरेख आहे. दोघीही सोशल मीडियावर एकमेकिंवरचं प्रेम व्यक्त करत असतात.
सासू सुनेची ही केमिस्ट्री आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मृणाल आणि शिवानी एकाच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित शिवराज अष्टकातील मागील चार पुष्पामध्ये मृणाल कुलकर्णी या जिजाबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत.
सुभेदार या पाचव्या पुष्पामध्ये सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे.
शिवानी रांगोळेचा हा पहिलाच ऐतिहासिक सिनेमा असणार आहे. त्यामुळे शिवानी आता सिनेमात काय कमाल करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.