NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'Raj Kundra's Dirty picture' अश्लिल चित्रफितीच नाही, IPL फिक्सिंग-अंडरवर्ल्डशी डील यातही फसला होता शिल्पा शेट्टीचा नवरा

'Raj Kundra's Dirty picture' अश्लिल चित्रफितीच नाही, IPL फिक्सिंग-अंडरवर्ल्डशी डील यातही फसला होता शिल्पा शेट्टीचा नवरा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. पण याआधीही राजवर अनेक आरोप लावण्यात आले होते. पाहा कोणते होते हे आरोप.

110

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला सोमवारी मुंबई क्राइम ब्रॅंचने अटक केली. अश्लिल चित्रफिती बनवणे आणि साइट्सवर अपलोट करणे या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे. पण आधीही अनेकदा राज कुंद्रा विवादात सापडला होता. पाहा कोणकोणते आरोप आहेत राज कुंद्रावर.

210

अनेक आरोप राज कुंद्रावर याआधीही लागले आहे. ज्यात पहिल्या पत्नीपासून घटस्फोट ते अंडरवर्ल्ड असे अनेक विवाद आहेत.

310

रंगीन लाइफस्टाइल, शिल्पा शेट्टीसोबत विवाह, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट आणि होम शॉपिंग चॅनल अशा अनेक गोष्टींमुळे राज सतत चर्चेत राहिला आहे.

410

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये मॉरिशसच्या एका कपंनीसोबत मिळून IPL मध्ये पैसे गुंतवले होते, आणि एक टीम विकत घेतली होती. 2013 मध्ये राज कुंद्राचं नाव सट्टेबाजीत आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

510

इंडियन प्रिमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केसमध्ये राज कुंद्राचं नाव आलं होतं. त्यानंतर त्याच्या टीममधील काही खेळाडूंनाही अटक करण्याक आली होती.

610

त्यानंतर २ वर्षे राज कुंद्राला आयपीएलमधून बॅन करण्यात आलं तर २०१५ नंतर त्याला आजीवन बॅन लावण्यात आला.

710

2017 मध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर फसवणूकीचा गु्न्हा दाखल झाला होता. याशिवाय अन्य ५ लोकांना IPC कलम 420, 406 नुसार FIR नोंदवण्यात आली होती.

810

2018 मध्ये राज कुंद्रावर एका अशा कंपनीसोबत काम करण्याचा आरोप लागला होती, जी 2000 कोटींच्या घोटाळ्याची सहभागी होती. गेनबिटक्वाइन असं या कंपनीचं नाव होतं. त्यानंतर ईडीने राजवर कारवाई केली होती.

910

याशिवाय अंडरवर्ल्डसोबतही राजचं नाव जोडलं गेलं होतं. इकबाल मिर्ची नावाच्या डॉनसोबत त्याचे संबध समोर आले होते. यासंदर्भात ईडीने त्याची १० तास मोठी चौकशी केली होती.

1010

मुंबई नंतर ठाणे पोलिसांनीही त्याची चौकशी केली होती. एक बोगस कंपनी बनवून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर होता.

  • FIRST PUBLISHED :