अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 2020 मध्ये सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला. आता तिची लेक तीन वर्षांची झाली आहे.
कोविडमुळे शिल्पा शेट्टीच्या लेकीचं दोन वर्ष घरातच बर्थडे साजरा करण्यात आला. त्यामुळे या वर्षी अभिनेत्रीने लेकीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे.
शिल्पा शेट्टीची मुलगी समिशाची नुकतीच बर्थडे पार्टी पार पडली. थीमवर आधारित असलेली ही बर्थडे पार्टी स्वप्नवत होती.
शिल्पा शेट्टीने समिशाच्या वाढदिवसाच्या पार्टीची झलक नुकतीच चाहत्यांसोबतशेअर केली. या पार्टीत फोटोबूथ, व्हिडिओ गेम्स आणि टॅटू स्टेशन आणि डान्स फ्लोअरसोबतच मजेशीर राइड्सचा समावेश होता.
समिशाच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिल्पा शेट्टी,राज कुंद्रा तसेच तिची मावशी शमिता शेट्टीने देखील सहभाग नोंदवला होता.
सगळेजण खूपच आनंदात मजा करताना दिसत आहेत.
ही झलक शेअर करत शिल्पा म्हणाली कि, 'जेव्हा तुम्ही तुमच्या ३ वर्षांच्या मुलीचा पहिल्यांदा वाढदिवस साजरा करता तेव्हा ते एक मिनी-वेडिंग सेलिब्रेशन होते.'
शिल्पाने लेकीसाठी आयोजित केलेल्या या ग्रँड पार्टीची सगळीकडेच चर्चा होतेय.