गेल्या 3 दशकांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या सुपरस्टार शाहरुख खानसाठी 2015 ते 2018 ही वर्षे खूपच वाईट होती. हा तो काळ होता जेव्हा शाहरुख बॉक्स ऑफिसवर साधा 1 हिट चित्रपट देऊ शकला नाही. यानंतर 2023 च्या सुरुवातीलाच त्याने परत दाखवून दिलं आपणचं खरे सुपरस्टार आहोत.
2013 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 2014 मध्ये 'हॅपी न्यू इयर' सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर शाहरुखचं फिल्मी करिअर काहीसं नीट चालत नव्हते. 2015 मध्ये आलेला त्याचा 'दिलवाले' हा चित्रपट सेमी हिट ठरला होता, त्यानंतर 2016 मध्ये आलेला त्याचा 'फॅन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला होता, त्यानंतर त्याचे दोन चित्रपट सलग सेमी हिट ठरले होते, ज्यात 'डियर जिंदगी (2016)' आणि 'रईस' (2017) यांचा समावेश होता.
2017 मध्ये आलेला त्याचा दुसरा चित्रपट 'जब हॅरी मेट सेजल' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि 2018 साली आलेला त्याचा 'झिरो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच वाईटपणे आपटला. यानंतर शाहरुखचे स्टारडम संपणार की काय, असे सर्वांना वाटत होते, पण तसे झाले नाही. सततच्या अपयशानंतर शाहरुखने एक मोठा निर्णय घेतला आणि 4 वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक घेतला.
शाहरुखने 2023 च्या सुरुवातीला 'पठाण' चित्रपटाद्वारे 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर असे पुनरागमन केले की, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शाहरुखच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या रिलीजसह तो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
या चित्रपटाद्वारे शाहरुखने बॉक्स ऑफिसवर स्वतःचाच विक्रम मोडला, त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाईचा जागतिक चित्रपट दिला. इतकंच नाही तर जगभरात 1042.2 कोटींची कमाई करत आजपर्यंत बॉलीवूडमधला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता प्रेक्षक त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.