शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटातून जबरदस्त पुनरागमन केले आणि तोच बॉलिवूडचा खरा 'बाजीगर' असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. शाहरुख खान आता लवकरच त्याचा पुढचा चित्रपट 'जवान' घेऊन येत आहे. 'पठाण' हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट असला तरी कलेक्शनच्या बाबतीत तो आमिर खान, प्रभास, यश यांच्या चित्रपटांच्या मागेच आहे. पण शाहरुखचा 'पठाण' एका बाबतीत मात्र या सगळ्यांवर भारी पडला आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत आमिर खान हा बादशाह आहे, ज्याच्या 2016 च्या 'दंगल' चित्रपटाने जगभरात 1924 कोटींची कमाई केली होती. प्रभासचा 'बाहुबली 2: द कन्क्लुजन' जागतिक स्तरावर १७४२ कोटी रुपयांच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यशच्या 'KGF 2' नंतर, 'पठाण' 1042 कोटींच्या कलेक्शनसह 5 व्या स्थानावर आहे, जरी बॉक्स ऑफिसवर पहिल्या वीकेंडच्या कमाईचा विचार केला तर, 'पठाण'च्या पुढे कोणीही नाही.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी 5000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ओपनिंग वीकेंडला जवळपास 160 कोटी रुपयांची कमाई करून इतिहास रचला. रिलीजच्या पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत 'पठाण' पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत 'पठाण' नंतर 'KGF चॅप्टर 2', 'बाहुबली 2', 'संजू', 'टायगर जिंदा है', 'सुलतान', 'दंगल' आणि 'ब्रह्मास्त्र'चा क्रमांक येतो.
'पठाण'नंतर शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर पुन्हा मोठा धमाका करू शकतो. अभिनेत्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटाच्या टीझरने सर्वांचे मन जिंकले आहे. 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरूखचा आतापर्यंत कधी न पाहिलेल्या अवतारात पाहायला मिळाला. यानंतर तो राजकुमार हिरानीच्या 'डंकी'मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्या विरुद्ध तापसी पन्नूला कास्ट करण्यात आले आहे.