अभिनेता शाहरुख खानचा पठाण सिनेमा रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
पठाण सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमाच्या रिलीजच्या 10 दिवस आधीच सिनेमाचं मोठ्या प्रमाणात अँडवान्स बुकींग सुरू झालं आहे.
काही प्रसिद्ध थिएटर्स आणि मल्टीप्लेक्समध्ये पठाण सिनेमाचं मोठ्या प्रमाणात बुकींग सुरू झालं आहे.
आतापर्यंत पठाण सिनेमाचं 1,17000 हून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे.
शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण पाहण्यासाठी थेट संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.
पठाणच्या अँडवान्स बुकींगच्या तिकिटांचा हार चाहत्यांनी शाहरुखच्या पोस्टरला घातला. व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
प्रेक्षकांनी पठाणच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकिटांसाठी थिएटरच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.
पठाण सिनेमात शाहरुख आणि दीपिकाचा जबरदस्त रोमान्स पाहायला मिळणार आहे.
देशभरात 25 जानेवारीला 10 हजाराहून अधिक स्क्रिन्ससह पठाण रिलीज होणार आहे.
गुरूग्रामच्या एंबियस मॉलमध्ये पठाण सिनेमाचं एक तिकिट 2400 रुपयांना विकण्यात आलं आहे.
पठाण सिनेमावरून मोठा वाद निर्माण झाला. पठाण आणि शाहरुखला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली मात्र अँडवान्स बुकींमुळे पठाण रिलीजआधीच हाऊसफुल्ल होताना दिसत आहे.
2400 रुपये इतकं महाग तिकीट असूनही प्रेक्षक सिनेमाचं अँडवान्स बुकींग करत आहेत.