NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आधी कोरोना मग ब्रेनस्ट्रोक-पॅरालिसिसची ठरली बळी; गंभीर आजारावर मात करत शाहरुखच्या अभिनेत्रीचं कमबॅक

आधी कोरोना मग ब्रेनस्ट्रोक-पॅरालिसिसची ठरली बळी; गंभीर आजारावर मात करत शाहरुखच्या अभिनेत्रीचं कमबॅक

कोरोना काळात एकीकडे लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत लोकांना मदत करण्याचा पर्याय निवडला. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिखा मल्होत्रा. शिखाने शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटात काम केले आहे. तसंच तिने कोरोनाच्या काळात नर्स बनून लोकांना खूप मदत केली. त्यानंतर तिच्यासोबत खूपच वाईट घटना घडली. पण आता या सगळ्यावर मात करत अभिनेत्रीने पुन्हा कमबॅक केलं आहे.

18

कोरोना काळात एकीकडे लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत लोकांना मदत करण्याचा पर्याय निवडला. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिखा मल्होत्रा.

28

अभिनेत्री होण्यापूर्वी शिखाने नर्सिंगचे शिक्षण घेतले होते. त्यानंतरच तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला.

38

शिखाने सगळ्यात पहिल्यांदा शाहरुख खानच्या फॅन या चित्रपटात छोटी भूमिका केली होती. त्यानंतर 2020 मध्ये आलेल्या कंचली या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

48

शिखाच्या डेब्यू झाला होता, पण तेव्हाच कोरोनाचा शिरकाव झाला. अशा काळात तिने आपली कला बाजूला ठेवत लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने बीएमसी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली.

58

शिखाने सुमारे वर्षभर जनतेची सेवा केली. यानंतर ती स्वतः कोरोनाच्या विळख्यात सापडली. कोरोनातून बरे होत असताना शिखाला अजून एका गंभीर आजाराचा सामना करावा लागला.

68

शिखाला ब्रेनस्ट्रोक आला. त्यातच ती अर्धांगवायूची शिकार झाली. अशा परिस्थितीत शिखा एकाच वेळी अनेक आजारांशी लढत होती. औषधांमुळे तिचे वजनही खूप वाढले होते पण तिने हार मानली नाही.

78

शिखाला अनेक आजारांनी घेरले होते. अशा परिस्थितीत तिला प्रकृतीसाठी बराच वेळ द्यावा लागला पण तिने हार मानली नाही. ती या सगळ्यातून बरी झाली.

88

अथक प्रयत्नांनी तिने तिचं वजनही कमी केलं असून, आता ती पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. शिखाच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :