शाहिद कपूर आणि करीना कपूर चा 'जब वी मेट' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. या सिनेमातील करीना आणि शाहिदच्या केमिस्ट्रीसोबतच दोघांचा अभिनय लोकांना खूप आवडला होता. दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. (फोटो साभार-Instagram)
शाहिद आणि करीना कपूर हे दोघेही खऱ्या आयुष्यात देखीलत एकमेकांवर प्रेम करत होते. पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात दोघांमध्ये प्रेम होतं. शाहिद आणि करीनाच्या रिलेशनशिपच्या बातम्यांची देखील जोरदार चर्चा रंगली होती. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या बातमीने मात्र चाहत्यांच्यात नाराजी पसरली होती.(फोटो साभार-Instagram)
करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद कपूरचं नाव त्याच्याच विवाह चित्रपटाची नायिका असलेल्या अमृता रावसोबत जोडलं गेलं होतं. शाहिद कपूर करीनासोबतच्या ब्रेकअपनंतर तो अमृता रावच्या प्रेमात पडला होता. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, असंही बोललं जात होतं. आता शाहिद कपूरने याबद्दल सांगितलं आहे. (फोटो साभार-Instagram)
या मुलाखतीत शाहिद कपूर म्हणाला की, 'करीना आणि माझ्या ब्रेकअपनंतर मी अमृता रावला डेट करू लागलो अशी अफवा पसरली होती. पण या सर्व गोष्टी चुकीच्या होत्या. अमृता आणि मी चार वर्षांपासून मित्र होतो. मी माझ्या मित्रांसोबत चित्रपट बघायला गेलो होतो. अमृताही आमच्यासोबत होती. आम्ही रात्री चित्रपट पाहिला आणि जेव्हा शो संपणार होता, तेव्हा थिएटर मॅनेजरने आम्हाला सांगितले की 8-10 लोक कॅमेरा घेऊन तुमची वाट पाहत आहेत. रात्रीचे 2 वाजले होते. मी बाहेर जाऊन फोटो काढले. पण आम्ही डेटिंग करत असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या होत्या. (फोटो साभार-Instagram)