NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shahid kapoor: शाहिदला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण; संघर्षाचे ते दिवस आठवून म्हणाला 'तेव्हा माझ्यासाठी कोणीही...'

Shahid kapoor: शाहिदला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण; संघर्षाचे ते दिवस आठवून म्हणाला 'तेव्हा माझ्यासाठी कोणीही...'

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहिदने 2003 मध्ये केन घोषच्या इश्क विश्क या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटातील शाहिदच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. तेव्हापासून मात्र त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत संघर्षाचे दिवस आठवून शाहिद भावुक झालेला पाहायला मिळाला.

18

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहिदने 2003 मध्ये केन घोषच्या इश्क विश्क या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता.

28

शाहिदने शेअर केले की मीराने इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याच्यासाठी पार्टी ठेवली होती. या पार्टीत तिने रमेश सुरानी आणि केन घोष यांना देखील आमंत्रित केले होते.

38

इश्क विश्कचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले होते. या अभिनेत्याने रमेश सुराणी यांच्यासोबत त्याच्या कारकिर्दीत बरेच काम केले आहे, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही.

48

त्यांच्याबद्दल बोलताना शाहिद म्हणाला की, "मी त्यावेळी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचो आणि मला एक चित्रपट द्या म्हणून मागे लागायचो. हे असं अडीच वर्ष चाललं. पण रमेश सुराणी यांनी शाहिदला लवकर काम दिलं नाही.'

58

पण आता जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा हे त्याच्याच भल्यासाठी होतं असं शाहिद म्हणाला. याच कारण म्हणजे तेव्हा तो खूप लहान होता.

68

तो म्हणाला, "मी पदार्पण केले तेव्हाही मला वाटले की मी खूप लहान आहे. माझ्या वयाचे कोणीही सहकलाकार नव्हते, कोणीही माझ्यासाठी अशा स्क्रिप्ट्स लिहिल्या नाहीत. हा एक संघर्ष होता."

78

वर्क फ्रंटवर, शाहिदचा ब्लडी डॅडी 9 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अभिनेता क्रिती सेननसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

88

या आगामी चित्रपटाविषयी बोलताना शाहिदने शेअर केले की, "हा एक वेगळा विषय आहे आणि ही एक प्रेमकथा आहे. हा माझ्यासाठी खूप मजेदार अनुभव आहे." शाहिदला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • FIRST PUBLISHED :